आहार योजना - आरोग्यनाथ हीलिंग सेंटर (LIFESTYLE)

आहार योजना - आरोग्यनाथ हीलिंग सेंटर सामान्य सूचना: प्रत्येक वेळी फक्त 75% पोट भरा. अन्न चावून खा (प्रत्येक घास 20-25 वेळा). सकाळी आणि रात्री मोठा ग्लास गरम पाणी प्या. जेवणाच्या मध्ये भूक लागल्यास मूठभर शेंगदाणे, सुकामेवा, किंवा ग्रीन टी/ब्लॅक टी (साखर नसलेली) घ्या. जेवणाआधी कधी कधी सुप घ्या. सकाळची दिनचर्या (६-८ वाजता) पाणी: मोठा ग्लास गरम पाणी. नाश्ता: ताजे हंगामी फळे (उदा. पेरू, केळं, संत्रं, किंवा पपई). मूठभर सुकामेवा (बदाम, अक्रोड, मनुका, किंवा अंजीर). दुपारचे जेवण (१ १ -२ वाजता) मुख्य जेवण (75% पोट भरा): मुख्य अन्न: भाकरी (ज्वारी/बाजरी) किंवा गव्हाची पोळी. प्रोटीन: वरण, उसळ (मटकी, मूग), किंवा मूग डाळीची खिचडी. भाजी: हंगामी भाजी (उदा. भरली वांगी, मेथीची भाजी). भात: थोडा वाफवलेला भात (आवडीनुसार). कोशिंबीर: काकडी, गाजर, बीट, आणि टोमॅटोची ताजी कोशिंबीर. साइड डिश: लोणचं किंवा चटणी (थोड्या प्रमाणात) आणि दही किंवा ताक. सुप: कधी कधी जेवणाआधी गरम सुप प्या. दुपारनंतरचा नाश्ता (४ वाजता) मूठभर भाजलेले शेंगदाणे, चणे, किंवा मिक्स नट्स. किंव...